प्रवेश

आमच्या विषयी

 

मुंबई विद्यापीठ (पहिले बॉम्बे विद्यापीठ म्हणुन ओळखले जात होते.) हे भारतातील जुन्या आणि प्रतिष्ठित विद्यापीठापैकी एक आहे. "वुड्स शैक्षणिक योजने" अंतर्गत मुंबई विद्यापीठची स्थापना सन १८५७ मध्ये झाली आणि भारतातील प्रथम तीन विद्यापीठांपैकी एक असा मान मिळवला.

बॉम्बे शहराचे मुंबई हे नाव बदलण्याचा परिणाम म्हणुन विद्यापीठाचे नाव "बॉम्बे विद्यापीठ" बदलुन "मुंबई विद्यापीठ" असे झाले; सदर अधिसूचना ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र सरकार द्वारा लागू केलेल्या राजपत्रात प्रकाशित झाली.