प्रवेश

ई - विद्वता केंद्र

तंत्रज्ञानाची ओळख आणि ई – लर्निंगचा उपयोग करण्यासाठी डीएलएलईला यूजीसीकडुन आर्थिक सहायता प्राप्त झाली आहे. विद्यार्थी, कार्यक्षम लोकसंख्या, नागरिक इत्यादीसाठी केंद्र ऑनलाइन पाठ्यक्रम विभागाने ई - लर्निंग केन्द्र स्थापित केले आहे. त्याचप्रमाणे यूजीसीकडुन दहाव्या वित्तसहाय्य योजनांतर्गत विद्यार्थी नियुक्ति / कैरियर मार्गदर्शन केन्द्र स्थापित केले आहे.

आदेशानुसार विभागाच्या माध्यमातुन ई – लर्निंगची ओळख कॉलेज, शिक्षक आणि विद्यार्थी यांना करुन देण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. विभागाने एका नियमित आधारावर अल्पावधीत ई – लर्निंग मॉड्यूलची ओळख करुन देण्याचा प्रयत्न करत आहे.

यूजीसीने प्रस्तावित केले कि देशामध्ये ३० ई – लर्निंग केंद्र स्थापित होणार त्यासाठी विभागाने ऊचलेली पाऊले :

१. मुंबई विद्यापीठमध्ये ई – लर्निंगची ओळख विस्तार कार्य शिक्षक आणि विद्यार्थी यांना करुन देण्यास खालील कार्यक्रम सुरु केले.

  • २३ नोव्हेंबर २००४ रोजी विस्तार कार्य शिक्षकांसाठी ई – लर्निंगवर पूर्ण एक दिवस दिशानिदेशन कार्यक्रम आयोजित केला होता.
  • विस्तार कार्य विद्यार्थ्यासाठी ई – लर्निंगवर तीन दिशानिदेशन कार्यक्रम ६ आँगस्ट २००४. २४ सप्टेंबर २००४ आणि १० डिसेंबर २००४ रोजी आयोजित केले होते.
  • विस्तार कार्य विद्यार्थ्यासाठी ई – लर्निंगवर एक दिशानिदेशन कार्यक्रम १६ ते ३० डिसेंबर २००४ पर्यंत आयोजित केले होते.
  • विभागाने सतत शिक्षण अभ्यासक्रम देऊ केला म्हणजे १९ ते २९ एप्रिल २००५ पर्यंत ई - लर्निंग मॉड्यूलचे प्रशिक्षण दिले.
  • २३ नोव्हेंबर २००६ रोजी विस्तार कार्य शिक्षकांसाठी ई – लर्निंगवर पूर्ण एक दिवस दिशानिदेशन कार्यक्रम आयोजित केला होता.

२. डीएसीइइ च्या संचालकांना ई – लर्निंगच्या कल्पनेशी ओळख करुन देणे ज्यामुळे त्यांना योजना बनवण्यास आणि त्यांच्या विभागात ई - लर्निंग केन्द्र स्थापन करण्याचा प्रस्ताव यूजीसीसमोर सादर करण्यास सहाय्यता होईल.

  • प्रौढ विभाग, सतत शिक्षण, विस्तार आणि फील्ड आउटरीच विभागांचे संचालक यांच्यासाठी राष्ट्रीय ई – लर्निंग दिशानिदेशन कार्यक्रम २६ ते २८ आँक्टोबर २००४ पर्यंत आयोजित केले होते.